हिंदू शुभ वार्ता (Marathi)

Hindu Good News

जग परिवर्तनाच्या  काळात आहे. जागतिकीकरण, राष्ट्रीय सीमा ओलांडून लोकांची वाढती हालचाल, पर्यावरणीय आव्हाने, धार्मिक संघर्ष, उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि बहु-ध्रुवीय जग ही सर्व जुन्या मानवी पेचप्रसंग व समस्यांचे निराकरण करण्याच्या विचारात बदल घडवून आणत आहे.

आजची आव्हाने सोडविण्यासाठी दिलेले अनेक उपाय निरुपयोगी  (जुने), कालमर्यादीत आणि अपुरे वाटतात. त्यांचा प्रसार करण्यासाठी स्थापन केलेल्या संस्था प्रामुख्याने पाश्चिमात्य जागतिक दृष्टिकोनावर आधारित आहेत, ज्याचे जगाच्या कारभारावर जवळजवळ अर्धशतकभर प्रभुत्व आहे. हा दृष्टिकोन प्रामुख्याने इतिहास, दंतकथा, बौद्धिक परंपरा आणि विशेषत: युरोप आणि अमेरिकेच्या धार्मिक  विचारांवर (समजूतींवर) आधारित आहे.

आता पुन्हा एकदा जगाचे सत्ताकेंद्र आशियाच्या दिशेने वळत आहे आणि विकनसशील अर्थव्यवस्था आणि जागतिक  शक्तींची हालचाल सुरु झाली आहे आणि त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेला उत्तेजन देत आहेत, तेव्हा आपण संधीच्या क्षणी उभे आहोत. आपल्यापैकी बरेच जण जगाच्या विविध विचारांकडे दुर्लक्ष करू शकतात, विशेषत: जेव्हा ते दीर्घकाळ प्रचलीत असलेल्या विचारांना आव्हान देतात ज्याची आपल्याला सवय असते. किंवा आपण पाश्चात्य विशेषाधिकारप्राप्त पदाला हानिकारक असणारी  नवीन विचहरसरणी देऊ शकतो, परंतु केवळ पाश्चात्य लोकांच्या हितासाठीच नव्हे तर सर्व मानवतेसाठी जगाला नव्याने आकार देण्याची त्यांच्यात क्षमता असल्याची आशा आहे.

जुन्या उदाहरणांपैकी एक वाक्य जें आपण सर्वांनी ऐकले आहे,     ते आहे ख्रिश्चनांनी वापरलेले “शुभ वार्ता” हे वाक्य.  (“शुभ वार्ता” हा शब्द गॉस्पेल या शब्दाचा शाब्दिक अनुवाद आहे, ज्यामुळे बायबलमधील येशूच्या जीवनाचे वर्णन होते.) ख्रिश्चन शुभ वार्ता सहसा मानवजातीच्या पापांच्या प्रायश्‍चित्तासाठी, आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याचे वधस्तंभावर बलिदान देऊन देवाने केलेल्या तारण कार्यशी संबंधित असते तरीही हिंदूंना असे प्रायश्चित्त अनावश्यक वाटते. कारण मनुष्य सर्व पापी नाही तर परमात्मा आहे. आणि आपण, आपल्यातील प्रत्येकजण, येशूसारख्याच सामर्थ्याने संपन्न आहे, इथे आणि याक्षणी – दुसर्‍याच्या मागील बलिदानाची गरज न बाळगता, हि सशक्तीकरणाची कल्पना स्पष्ट करण्यासाठी आम्ही “हिंदू शुभ वार्ता”™ हा शब्द तयार केला आहे

अशी आनंदाची बातमी केवळ हिंदु शुभ वार्तेची एक झलक आहे – जी मनुष्याच्या स्वतःच्या क्षमता उंचावते, देव, मनुष्य आणि विश्व यांच्या आवश्यकतेच्या ऐक्यावर जोर देते आणि एकसारखेपणा ऐवजी विविधता हेच वास्तविकतेचे सत्य आहे हे समजून घेण्यावर भर देते. अशा वैश्विक दृष्टीच्या काही महत्त्वपूर्ण आश्वासनांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

– ठराविक ख्रिश्चन अर्थाने मूळचे पाप यासारखी कोणतीही गोष्ट नाही. सत-चित-आनंद या संस्कृत शब्दाने वर्णन केलेले आपण सर्वच दैवी आहोत

– ख्रिस्ती आणि बहुतेक सर्व अब्राहमिक धर्माप्रमाणे ऐतिहासिक संदेष्टे व तारणारे (मसीहा) आध्यात्मिक सत्य आपल्याच ताब्यात ठेवू शकत नाहीत. योग आणि संबंधित आध्यात्मिक पद्धतींमुळे आम्हाला इतिहासापासून स्वातंत्र्य मिळविण्याची शक्ति मिळते – यात ऐतिहासिकदृष्ट्या आकारालेली सामुदायिक ओळख, वंश, वंशावली आणि काही विशिष्ट ऐतिहासिक घटनेवर आधारित धार्मिक विशिष्टतेचा दावा यांचा समावेश आहे. दुसऱ्या शब्दांत, आम्ही ऐतिहासिक संदेष्ट्यांवर किंवा त्यांच्यानंतर विकसित झालेल्या शक्तीशाली संस्थांवर अवलंबून नाही.

– धर्म आणि विज्ञान यांच्यात कोणताही मूलभूत संघर्ष नाही आणि यापूर्वीही असा कोणताही संघर्ष न्हवता.

– पाश्चात्य ब्रह्मांडशास्त्र आणि दतंकथांप्रमाणे “अनागोंदी” ची भीती बाळगण्याची गरज नाही. जे नकारात्मक अर्थाने अनागोंदी मानले जाते ते म्हणजे वास्तविकतेचे नैसर्गिक आणि सामान्य प्रकटीकरण आहे. केवळ मानवी जाणिवेच्या मर्यादाच निसर्गाच्या जटिलतेचा चुकीचा अर्थ लावतात, त्यास भयभीत आणि वाईट म्हणून पाहतात आणि संहार करण्यायोग्य मानतात.

– निसर्गाचा आदर करताना आनंदी मानवी जीवन शक्य आहे. “उन्नति” आणि “प्रगती” होण्यासाठी निसर्गाचा नाश करण्याची गरज नाही – खरंतर आपले पोषण करणाऱ्या परस्पर संयोजकतेच्या (इंटरकनेक्टिव्हिटीच्या) जाळ्याचे उल्लंघन न करता आपली स्वतःची उत्क्रांती वेगवान होईल.

– आपल्या अंतिम अध्यात्मिक मार्गाकडे जाण्यासाठी कोणत्याच केंद्रीय धार्मिक हुकमतीची आवश्यकता नाही. मार्गदर्शक तत्त्वे म्हणून मागील उदाहरणांचा शोध आणि साधनांचा वापर करुन स्वतःचा एखादा मार्ग अनुभवू आणि शोधू शकतो.

– सर्व धर्म आणि परंपरा यांच्यात परस्पर आदर हा हिंदू धर्मातील तत्त्वाचा विषय आहे, “राजकीय शुद्धता” किंवा बाहेरून लावण्यात आलेली अवीट आवश्यकता नाही. जे लोक वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात त्यांच्यासाठी हे “सहिष्णुतेच्या” पलीकडे आहे. आम्ही विशिष्टतेचे (एकमात्रतेचे)  दावे आणि इतरांचे स्वतःच्या धर्मात धर्मांतरण करण्याचे आदेश नाकारतो.

या वेबसाईटवर  https://BeingDifferentBook.com अशा प्रकारच्या कल्पना, धारणा व कार्यप्रणाली (पद्धती) या सर्व गोष्टींवर चर्चा आणि निबंध आहेत जे सर्व हिंदू शुभ वार्ता ™ या छत्रछायेखाली आहेत. या निबंधांमध्ये हिंदु, बौद्ध, शीख आणि जैन धर्म या सर्व भारतीय धर्मविषयक परंपरांचे तत्वज्ञानात्मक व आध्यात्मिक बिचार समाविष्ट आणि प्रतिबिंबित आहेत. वरील मुद्दे मार्गदर्शक म्हणून आणि चालू असलेल्या चर्चा आणि वादविवादांद्वारे, आम्ही आंतर-धर्मीय संबंध, धार्मिक श्रध्दा आणि विज्ञान यांच्यातील संबंध आणि मानवता आणि निसर्ग यांच्यातील संबंधांचे एक नवीन पर्व आणू अशी आशा करतो

नुकतेच प्रकाशित झालेले “विभिन्नता पाश्चात्य वैश्विकतेला एक भारतीय आव्हान” (बीइंग डिफरंट: अ इंडियन चॅलेंज टू वेस्टर्न युनिव्हर्सलिझम) (हार्परकोलिन्स, २०११) (BEING DIFFERENT: An Indian Challenge to Western Universalism) (Harpercollins, 2011) हे पुस्तक हा जागतिक दृष्टिकोन, यहुदी-ख्रिश्चन (ज्यूडेओ-ख्रिश्चन), युरोपियन ज्ञानोदय  (European Enlightenment), उत्तर आधुनिकतावादी  (postmodernist thought) आधारीत  चर्च आणि राज्य वेगळे करणे (निधर्मीय विविधता (धर्मनिरपेक्षता)) यासह मुख्य पाश्चिमात्य विचारधारांपेक्षा कसा वेगळा आहे याची तपासणी करते.

Translation of – https://HinduGoodNews.com

Leave a Reply